रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

OTT बद्दल थोडक्यात जाणून घेऊयात : Multimedia in Marathi

 OTT बद्दल थोडक्यात जाणून घेऊयात ,


ओटीटी या प्लॅटफॉर्मचा फुल्लफॉर्म OVER The Top प्लॅटफॉर्म असा आहे. हा ऑडिओ व्हिडीओ होस्टिंग प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) वापरणारे असे Content शोधून काढते जो वापरकर्त्यांला आवडेल. पूर्वी वापरत असणाऱ्या ब्राउझर च्या हिस्ट्रीवरून कोणता content आवडेल ते पाहून तसा कंटेंट शोधून देण्याच काम AI करीत असते. हे Trail or FREEMIUM या मॉडेलवर काम करते, यामध्ये OTT प्लॅटफॉर्म हा काही कंटेंंट कुठलेही मूल्य न आकारता देतो तर काही कंटेंटकरिता वापरकर्त्यांना हा ott प्लेटफॉर्म सबस्क्राईब करायला लावतो. तो अशा कंटेंटकरिता सबस्क्राईब करायला लावतो की जो कंटेंट इतर कुठे ही उपलब्ध नाही.

भारतातील ओटीटीचे लोकसंख्याशास्त्र

BigFlix हे भारतातील पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म आहे, जो “रिलायन्स एंटरनमेंट”ने २००८ मध्ये सुरू केला. त्यांनतर जेव्हा २०१३ मध्ये Ditto Tv (Zee) आणि Sony Live हे सुरू करण्यात आले, तेंव्हा भारतात OTT प्लेटफॉर्मच्या व्यवसायाने वेग धरला. यानंतर २०१३ मध्ये Disney Hotstar लॉन्च झाले आणि ते भारतातील सर्वात जास्त वापर करणारे OTT प्लॅटफॉर्म ठरले. जागतिक पातळीवर वापरले जाणारे Netflix या OTT प्लेटफॉर्मने त्यांचे कामकाज भारतात २०१६ मध्ये सुरु केले. Disney Hotstar यांची जुलै २०२० पर्यंत त्यांची वापरकर्त्यांची संख्या ३०० दशलक्षाहुन अधिक झाली. सध्या या व्यवसायाच्या बाजारपेठेत Netflix, Disney Hotstar, Amazon Prime इ. एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले आहेत. भारतामध्ये ३५% असे वापरकर्ते आहेत की जे ० ते ३ तास तरी ओटीटी प्लेटफॉर्मचा वापर करतात. तर काही ३५% हे ३ ते ९ तास ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करतात तर ७% हे आठवड्यातून २१ तासाहून अधिक वापर करतात.

भारतातील ओटीटी उद्योगाच्या बाजारपेठा

सध्या भारतामध्ये ४० हुन अधिक OTT सेवा पुरविणाऱ्या आहेत. जे इंटरनेटच्या माध्यमातून सेवा पुरवितात. २०१८ मध्ये भारत ओटीटीच मार्केट २१५० करोड रुपयाच होत तेच मार्केट नंतर २०१९ मध्ये ३५०० करोड रुपयाचे झाले. पुढील काही वर्षात हे मार्केट अजून वाढेल याची शक्यता आहे. E&Y यांच्या अहवालानुसार २०२० मध्ये भारतात ओटीटी वापरकर्त्यांची संख्या ५०० दशलक्षाहुन अधिक होऊन भारत हे US नंतरच OTT च सर्वात मोठं मार्केट होऊ शकेल. “एंटरटेनमेंट गोझ ऑनलाइन” या नावाच्या बोस्टन कन्सलटिंग ग्रुपने सादर केलेल्या अहवालानुसार OTT मार्केट हे 5 बिलिअन यु.एस डॉलरच होईल. अशी शक्यता दर्शविली आहे. Disney Hotstar हे सध्याचे आघाडीचे OTT प्लॅटफॉर्म आहे त्याचे वापरकर्ते इतर OTT च्या वपरकर्त्यांच्या तुलनेत अधिक आहेत. त्यांनतर Amazon प्राईम, Sony liv, Netflix आणि Voot हे आहेत. मात्र जर Watchtime च्या आधारावर जर आपण OTT प्लॅटफॉर्म कोणते सर्वाधिक वापरले जाते हे पहिले तर कदाचीत याचा अहवाल वापरकर्त्यांद्वारे मिळालेल्या अहवालापेक्षा वेगळा येईल.

भारतात Ott प्लॅटफॉर्मचा वापर करणारे ३५ वयोगटापर्यंतचे वापरकर्ते असे आहे की जे 90% वेळ हा OTT प्लेटफॉर्मवर घालवितात. यातील 79% OTT चा वापर करणारे सर्वाधिक पुरुष आहेत.

इंडियन ओटीटी मार्केट इकोसिस्टममध्ये विविध उद्योग विभागातील कंपन्यांचा समावेश होतो.

त्यामध्ये,
दूरचित्रवाणीचे वितरक (टेलिव्हिजन डिस्ट्रिब्युटर्स ) : व्हिडिओकॉन, टाटा एससीआर, डी 2 एच, इतर


टेलिकॉम कंपन्या : एअरटेल, रिलायन्स जिओ, इ

सामग्रीची उपस्थिती असलेल्या कंपन्या (सा रे गा मा, फिल्टर कॉपी, इरोस नाव्ह (Eros Now) इ)

ब्रॉडकास्टर (प्रसारक) डीझनी+ हॉटस्टार, झी 5, इ

स्वतंत्र प्लॅटफॉर्म Amazon प्राइम, नेटफ्लिक्स इ.

ओटीटीचे बाजार हे जाहिरातींवर आधारित मॉडेल आहे. कारण ओटीटी प्लेटफॉर्मसाठी जाहिरात हे त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. त्यांच्या उत्पन्नातील सर्वात महत्वाचा भाग आहे.त्याचबरोबर सध्याचे सबक्रिप्शनवर आधारित कंटेंट मध्ये वाढ होताना दिसत आहे.

www.multimediainmarathi.in मधील ब्लॉगद्वारे प्राथमिक स्वरुपाची माहिती सध्या सरळ भाषेत आपणास द्यावी, जेणेकरून नंतर update होणारी माहिती आपणास समजणे सोयीस्कर होईल. मराठीतून माहिती देण हाच आमचा मानस आहे

चित्रपट : Movie (Motion Pictures) मल्टिमीडिया इन मराठी

 चित्रपट हे एक प्रभावी साधन आहे आणि त्याचबरोबर हि एक दृश्यात्मक कला आहे. हि एक प्रकारची कला आहे. ज्यामध्ये हालत्या चित्रांच्या मार्फत किवा चलचित्रांद्वारे लोकांचे मनोरंजन केले जाते. त्याचबरोबर माहितीपूर्ण संदेश हि मनोरंजनकरत लोकांपर्यंत पोहचविता येते. एक चित्र (फ्रेम किवा फोटो) हे खूप काही सांगून जाते. एखादे स्थिर चित्र जर इतक काही सांगून जाते तर आपण चलचित्रांबद्दल म्हटल तर त्याची परिणामकारकता स्थिर चित्रांपेक्षा अधिक असेल असे म्हणणे वावग काही ठरणार नाही.

संकल्पना, कथा, पात्र, अभिनय, कॅमेरा व प्रकाशयोजना, ध्वनी मुद्रण, संकलनाचे तंत्रज्ञान इतर बऱ्याच घटकांनी मिळून चित्रपट हि कला केली जाते. चित्रपट बनविणे हे कोणा एका कलाकाराचे काम नाही, जसे कि चित्रकार हा एकटाच चित्र काढून त्याची कला सादर करू शकतो. चित्रपट हि कला सादर करताना तिच्या निर्मितीपासूनच नव्हते तर निर्मितीच्या आधी पासून चित्रपटाकरीता विविध कलाकार लागतात.कलाकार म्हणजे फक्त अभिनेते नाही तर त्यात दिग्दर्शक,लेखक (संकल्पना, कथा, पटकथा, संवाद इ), चित्रकार (स्टोरीबोर्ड रेखाटणारा चित्रकार), डी ओ पी (शुटींग करणारा), ग्राफर(प्रकाश योजना करणारे), नृत्य दिग्दर्शक, संगीतकार गायक इतर असे विविध कलाकार मंडळी एकत्र येऊन त्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कलांचे एकत्रीकरण करून त्यातून एक कलेचा अविष्कार करतात, त्यातून जी कलाकृती निर्माण होते त्याला आपण चित्रपट असे संबोधू शकतो.

चित्रपट हे विविध जॉनर्समध्ये बनविले जातात.चरित्रयावर, विज्ञानावर,भयात्मक, विनोदात्मक, मनोरंजनात्मक, नाटयात्मक, समांतर, कल्पनात्मक, पौराणिक कथांवर आधारित, रोमांचक, गुन्हे विषयक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, सत्य घटनेवर आधारित तसेच इतर विविध जोनर्सवर चित्रपट बनविले जातात.